आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांची दिवाळी जोरात:दिवाळी सुटीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; 17 ऑक्टोबरपासून मुले होती घरी

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या सुटीचा आनंद घेतल्यानंतर बुधवारपासून पुन्हा शाळेचा आनंद घेण्यासाठी विद्यार्थी मित्रमंडळी शाळेच्या प्रांगणात हजर झाले. दिवाळी सुटीनंतर वर्ग मित्रांची झालेली भेट, दिवाळीत आपण केलेले पर्यटन, शिकलेल्या नवीन गोष्टी, वाचलेली पुस्तके सांगण्यात विद्यार्थी मित्र मधल्या सुटीत दंग होती. दिवाळीत केलेला फराळही मित्रांसाठी डब्यात आणायला विद्यार्थी विसरले नाहीत. आपण सुटीत केलेली गंमत, मज्जा शिक्षकांनाही विद्यार्थ्यांनी सांगितली.

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 17 ऑक्टोबरपासून शाळांना 8 नोव्हेंबरपर्यंत शाळांना दिवाळीची सुटी होती. ही सुटी संपल्यानंतर बुधवार 9 नोव्हेंबरपासून शाळा सुरु झाली. सुटीनंतर विद्यार्थ्यांच्या दोन वर्षातील शैक्षणिक परिणाम यामुळे दिवाळी सुटीत विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेत शाळांमध्ये शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी गृहपाठ देण्यात आले होते. जेणेकरून दिवाळी सुटीतही सणाचा आनंद घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी हसत-खेळत अभ्यासही करावा अशा पद्धतीने शाळांनी नियोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी भाषा, गणित, विज्ञान अशा विषयांची उजळणी केली. सुटीतील हा गृहपाठ बुधवारी शिक्षकांनी तपासणीसाठी घेतला. यासह दिवाळी सुटीत केलेली धमाल, मज्जा या विषयी शिक्षकांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांनो तुम्ही सुटीत काय, काय केले, पालकांसोबत सहलीला गेला होतात का, काय पाहिले याचाही एक तासच शाळेत झाला.

मित्रांसोबत मधल्या सुटीत दिवाळीतील फराळ चिवडा, लाडु, चकली असे एकत्रित खाण्याचा डबा पार्टीचा आनंदही विद्यार्थ्यांनी घेतला. याबरोबर शाळांनी शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्राचे नियोजन आखणी केली.दहावी, बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होत असल्याने शिक्षण मंडळ परीक्षांसाठी सराव परीक्षांचे नियोजनही करण्यावर शाळांचा भर आहे. तसेच परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम पूर्ण होऊन अधिकाधिक वेळ सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळावा याचीही तयारी शाळांनी सुरु केल्याचे मुख्याध्यापक, प्राचार्यांनी सांगितले. तर प्राथमिक, माध्यमिक इतर वर्गांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारीची लगबग शाळांमध्ये सुरु होत आहे. मागील दोन वर्ष करोनामुळे वार्षिक स्नेहसंमेलने जाहीररीत्या होऊ शकले नाहीत. यंदा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव वाव देणारे, व्यासपीठ देणारे स्नेहसंमेलने अधिक उत्साहाने होतील, असेही शिक्षकांनी सांगितले.

साप्ताहिक परीक्षेची तयारी

दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांनी नियमित कॉलेजमध्ये यावे. तासिका कराव्यात यासाठी साप्ताहिक परीक्षा घेण्यात येणार आहे.याची तयारी सुरू करण्यात आली असून, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत ह्या परीक्षा तेथील असे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के.देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...