आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप समारंभ:विद्यार्थ्यांनो, स्वत:मधील क्षमता ओळखा : भोकरे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:मधील कमतरता शोधण्यात अधिक वेळ न घालवता, स्वत:मधील क्षमता ओ‌ळखून विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतल्यास कुणीही यशापासून दूर ठेवू शकत नाही, असे प्रतिपादन जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी केले. बजाजनगर येथील राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयाेजित केला हाेता. त्या वेळी त्यांनी भविष्यातील संधी व अडचणी या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या वेळी ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले हाेते. शिक्षण संचालक अनिल साबळे, पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी मार्गदर्शन केले. आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष म्हणून बारावीकडे पाहण्याची गरज नाही. परिक्षेत उत्तीर्ण न झालेले विद्यार्थीदेखील यशस्वी आयुष्य जगतात, असे आमदार शिरसाट यांनी सांगितले. या वेळी संस्थाचालक एकनाथ जाधव, सरपंच सुनील काळे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...