आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वराज्याचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांतर्फे सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. पैठण गेट येथील टिळकांच्या तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर रीघ लागली होती. कै. नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयात दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. या वेळी रमाकांत जगत, प्रेमचंद तुल्ले, विजय जोग, डॉ. शामसुंदर कुडे, दौलतराव म्हस्के आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र हिंदी विद्यालय : महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक रवींद्र तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. वक्ते गोविंद गायकवाड, सोपान करवंदे, किरण पवार आणि लता सुरडकर यांनी साठे आणि टिळक यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
मराठा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक डॉ. रूपेश मोरे, उपमुख्याध्यापक सुहास मडके व शिक्षकांची उपस्थिती होती. स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पाचवी ते सातवीच्या गटातून संजना वानखेडे प्रथम, आराध्या सुरडकर द्वितीय आली. नंदिनी गवारेने तृतीय क्रमांक मिळवला. आठवी ते दहावीच्या गटात निकिता राठोड प्रथम, सानिया शेख द्वितीय, शिवराज खवळकर तृतीय आले.
श्री शिवाजी हायस्कूल : या संस्थेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. मुख्याध्यापिका एस. एम. पवार अध्यक्षस्थानी होत्या. सहशिक्षक एस. टी. ढवळे यांनी टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सांगितले. तर सहशिक्षिका ए. वाय. दाभाडे यांनी अण्णा भाऊ साठे यांचे जीवन चरित्र मांडले.
जागृती शाळेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात २१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ‘अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य’ व ‘लोकमान्य टिळक यांचे समाजकार्य’ या विषयावर विद्यार्थ्यांनी मते मांडली. अंश नितीन निकम प्रथम, नेहा सिद्धार्थ दाभाडे द्वितीय, जान्हवी सुभाष देवतवाल तृतीय आले. वैभवी जाधव हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. प्राथमिक विभागातून ईश्वरी मुखेकर प्रथम, राजलक्ष्मी अग्रवाल द्वितीय, रोहिणी निकम तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस सोहम कुरंकार हिला देण्यात आले. मुख्याध्यापिका अलका खोडे यांच्यासह शिक्षक, परीक्षक उपस्थित होते.
आंबेडकरवादी संघर्ष समिती : अध्यक्ष श्रावणदादा गायकवाड, गौतम गणराज, निमंत्रक आनंद कस्तुरे, राहुल साळवे, वसंतराज वक्ते, सचिन निकम आदींनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रौढ महिला विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
समर्थनगरातील प्रौढ महिला विद्यालयात दहावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शेळके, अण्णा वैद्य, आम्रपाली तायडे, पोलिस निरीक्षक प्रियंका भिवसने, मुख्याध्यापिका रंधे उपस्थिती होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.