आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्ता:विद्यार्थी गुणवत्ता वाढीच्या उपायांची माहिती द्यावी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत अजूनही सुधारणा होणे अपेक्षित आहेत. विविध संस्थांमार्फत गुणवत्तेचे आलेले अहवाल समाधानकारक नाहीत. त्यामुळे विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी कोणकोणते उपाय, कृती केली जात आहे याची माहिती १० फेब्रुवारीपर्यंत कळवण्यात यावी, अशा सूचना नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

विभागीय गुणवत्ता कक्ष व प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हॅप इंटरनॅशनल स्कूल येथे कार्यशाळा झाली. शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, डाएटचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख, डॉ. सतीश सातव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तीत एनईपी, पीजीआय, एफएलएन, नॅस, असरच्या अहवालानुसार औरंगाबाद विभाग कुठल्या स्तरावर आहे याचे विश्लेषण करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील.

एनईपी, पीजीआय, एफएलएन, नॅस, असरच्या अहवालानुसार देशभरातील शालेय शैक्षणिक परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यात येते. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी समान प्रमाणात मोजण्याचे काम पीजीआयच्या माध्यमातून होते. पीजीआयची संरचना कार्यक्षम, समावेशक आणि न्याय शालेय शिक्षणप्रणाली निर्मिती करण्यासाठी करण्यात आली आहे. या संरचनेत अध्ययन निष्पती, प्रवेश, पायाभूत सुविधा, समता आणि शासकीय प्रक्रिया या मापदंडाचा विचार होतो.

विभाग कुठे आहे याचे केले विश्लेषण, त्याचा आराखडा तयार करणार
केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने २०१८-१९ व २०१९-२० साठीचा पीजीआय (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स) प्रकाशित केला आहे. त्याअनुषंगाने विभागीय गुणवत्ता कक्षातर्फे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर कार्यशाळा घेतली. या अहवालानुसार औरंगाबाद विभाग कुठल्या स्तरावर आहे याचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर त्या-त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व डायटतर्फे विश्लेषणात्मक प्लॅन तयार करून दहा फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...