आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायज्ञाच्या समारोपप्रसंगी आवाहन:विद्यार्थ्यांनी 6 विद्यांमध्ये पारंगत होणे गरजेचे : डॉ. अखिलेश शास्त्री

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, ज्योतिष आदी सहा विद्यांमध्ये पारंगत व्हावे, असे आवाहन आचार्य डॉ. अखिलेश शास्त्री यांनी केले.आर्य समाज सरकारवाडा आणि महर्षी पाणिनी कन्या वेद पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ११ दिवसांचे अथर्ववेद सस्वर पारायण आणि महायज्ञाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या पारायणात मुलींनी प्रथमच दररोज अथर्ववेदातील ४०० मंत्रांचे उच्चारण केले. समारोपप्रसंगी शिवाजी शिंदे, योगाचार्य प्रदीप देशमुख, डॉ. लक्ष्मण माने, डॉ. सुजाता करंजगावकर आदींची उपस्थिती होती. या वेळी होमहवन करण्यात आले.

डॉ. शास्त्री म्हणाले, ‘होमहवनाने वायुप्रदूषण दूर होते. त्यामुळे ते केले पाहिजे. अग्नी जसा नेहमी वर जातो तशाच पद्धतीने व्यक्तीचे जीवन उत्कर्षाकडे गेले पाहिजे. प्रत्येकाने सुख-समृद्धीसह आरोग्य चांगले ठेवण्याचा संकल्प करावा.’ या वेळी आर्य समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...