आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानस्रोत केंद्र:संशोधनातील गुणवत्तेकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे ; कार्यशाळेत डॉ. अमृतकर यांचे आवाहन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संशोधनात गुणवत्तेला महत्त्व असते. संशोधन लेख तर विद्यापीठाची बौद्धिक संपदा मानली जाते. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन शोधनिबंध लिहिले पाहिजेत, असे मत मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रातर्फे आयोजित ‘स्प्रिंजर नेचर ऑथर वर्कशॉप’चे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्या वे‌ळी ते बोलत होते.

स्प्रिंजर नेचरच्या वरिष्ठ संपादक नूपुर सिंग म्हणाल्या, ‘संशोधनपर लेखाची रचना, लेख पाठवण्यासाठी योग्य नियतकालिकाची निवड कशी करावी? प्रकाशकांशी पत्रव्यवहार करण्याची पद्धत, लेख प्रकाशित झाल्यानंतरचे कार्य या विषयांवर त्यांनी सविस्तर मांडणी केली. रघु कुटप्पण यांनी स्प्रिंजर नेचर प्रकाशक इतिहास, प्रकाशनांतर्गत येणारे प्रकाशित ई-बुक्स, ई-जर्नल्सबाबत माहिती दिली. संचालक डॉ. धर्मराज वीर यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की, ‘ग्रंथालय वेबसाइटवर उपलब्ध स्प्रिंजर नेचरचे डेटाबेसअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेले हजारो ई-बुक, ई-जर्नल्सचा सर्वांनी लाभ घ्यावा.’ या वेळी १८० पेक्षा अधिक विद्यापीठांमधील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, महाविद्यालयीन ग्रंथपाल आणि ग्रंथालयीन व्यावसायिकांची उपस्थिती होती. डॉ. आनंद वाघ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सतीश पद्मे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन खिस्ते आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...