आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे बीबीए, बीसीए, बीसीएसच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन साेहळा सुरू आहे. यात बुधवारी विद्यार्थ्यांनी फेटा डे साजरा केला. या वेळी रंगीत फेटे बांधलेल्या तरुण-तरुणींना सेल्फी घेण्याचा मोहदेखील आवरला नाही. कारण, महाराष्ट्राची शान असणारा हा फेटा आजही एक स्टाइल स्टेटमेंट आहे. आजही महाराष्ट्रीयन लोकांचे या फेट्यावर तेवढेच प्रेम आहे, जेवढे राजा-महाराजांच्या काळात होते. जसे की ‘पगडी’… वेगवेगळ्या राज्यांत या पगडी घालण्याच्या वेगवेगळ्या स्टाइल्स आहेत तसेच महाराष्ट्रातील ‘फेटा’ हा देखील यांपैकीच एक. फेटा म्हणजे मराठ्यांची ओळख. अभिमान आणि प्रतिष्ठा व संस्कृतीचे प्रतीक होय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.