आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांचे शंका निरसन:दहावी, बारावी विषयाबाबत विद्यार्थी ई-मेलद्वारेही शंका मांडू शकणार

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी, बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर आल्या आहेत. परीक्षे दरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्यार्थ्यांना विषयनिहाय येणाऱ्या प्रश्नांचे शंका समाधान करते आहे. परीक्षा जवळ येत असल्याने आता ई-मेलद्वारेही प्रश्न उत्तरांची प्रक्रिया सुरू आहे.

करोनामुळे प्रत्यक्ष तासिका सुरू होण्यास लागलेला विलंब, सरावासाठी कमी वेळ मिळाला. त्यात विद्यार्थ्यांसाठी परिषदेने विद्यार्थ्यांना परीक्षा पॅटर्न, गुणांकन, विषयाच्या संबंधाने विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय असणाऱ्या शंकाचे समाधान करण्यासाठी विषयनिहाय तज्ज्ञांमार्फत युट्यूबद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. प्रक्रिया सुरू होऊन पंधरा दिवस होत आले परंतु विद्यार्थ्यांचा प्रतिसाद फारसा नाही. त्यात प्रत्यक्ष तासिका सुरू झाल्याने विद्यार्थी अभ्यासक्रम, सराव यात विद्यार्थी व्यस्त आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारेही प्रश्न मांडता येतील असे परिषदेने स्पष्ट केले. त्यामुळे काहीसा विद्यार्थ्यांना मिळेल असे सांगण्यात येते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. करोनामुळे फेब्रुवारी-मार्च ऐवजी एप्रिल-मेमध्ये परीक्षा होत आहेत. परंतु पुरेसा वेळ मिळाला नाही असे विद्यार्थी, पालकांचे म्हणणे आहे. त्यात अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कितपत लाभ होईल ये येणाऱ्या काळात समोर येईल. hsc@maa.ac.in या मेल तयार करण्यात आला असून विद्यार्थ्यांना विषयाच्या संबंधाने शंका, प्रश्न विचारता येणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसण करतील असे परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...