आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी परीक्षांना गुरुवारपासून (२२ डिसेंबर) प्रारंभ होत आहे. यात १६,१९३ विद्यार्थी ११० केंद्रांवरून परीक्षा देतील. पण अद्याप शेकडो परीक्षार्थींना हॉलतिकीट मिळाले नसल्याची तक्रार आहे. ही गंभीर चूक कॉलेजने केल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे काही विद्यार्थी सकाळच्या सत्रातील पेपरला मुकणार आहेत. विद्यापीठाच्या यूजी, पीजी परीक्षांचे वेळापत्रक १५ दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते.
सर्व विद्यार्थी कॉलेजकडे परीक्षा शुल्क भरतात. त्यावर कॉलेज मँडेट जनरेट करूनच हॉलतिकीट प्राप्त करू शकतात अशी व्यवस्था आहे. पण काही नव्याने संलग्नित झालेल्या कॉलेजांनी मँडेट जनरेट करण्यास उशीर केला आहे. विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारी हॉलतिकीट मिळणे अपेक्षित होते. पण तसे न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मेलवर ई-हॉलतिकीट प्राप्त होऊ शकले नाही. आता शेकडो विद्यार्थी सकाळी १० ते १ पर्यंतचे पेपर देऊ शकणार नाहीत. दुपारी जर ई-हॉलतिकीट मिळाले तर २ ते ५ दरम्यानचा पेपर विद्यार्थी देऊ शकतील. बी.ए., बी.एस्सी. व बी.कॉम. प्रथम सत्राच्या परीक्षाही २२ डिसेंबरपासूनच सुरू होत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.