आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय पोषण आहार:पालकांशी संवाद साधून विद्यार्थी स्थलांतर रोखणार यावर्षी रोखले 3200 मुलांचे स्थलांतर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिकसह माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्थलांतर होऊ नये, ते नियमित शाळेत यावेत यासाठी आता पालकांशी संवाद साधून त्यांचे स्थलांतर रोखणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली. २०१८-२०१९ मध्ये ३२०० विद्यार्थी थांबवण्यात यश आले होते. तसेच या काळातील शालेय पोषण आहारदेखील दिल्याचे त्यांनी सांगितले.

दरवर्षी ऑक्टोबरपासूनच ऊसतोड कामगार, वीटभट्टी असो वा इतर काही कामांनिमित्त विभागातून सुमारे ५० हजारहून अधिक नागरिक कामाच्या शोधात स्थलांतरित होतात. कामामुळे स्थलांतरित झालेले काही पालक मुलांसह तेथे गेले. ते अजूनही परत आलेले नाहीत. अशात आता पुन्हा स्थलांतरास सुरुवात होईल. त्यापूर्वीच शाळेतील मुलांची गैरसोय होऊ नये, त्यांचे शिक्षण थांबता कामा नये या उद्देशाने गेल्या दोन वर्षांत हंगामी वसतिगृह सुरू नव्हते. परंतु आता परिस्थिती निवळल्याने पुन्हा हंगामी वसतिगृहांसाठी प्रस्ताव मागवण्यात येणार असून औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावमधील काही भाग, पैठण, खुलताबाद, कन्नड येथून अधिक लोकांचे स्थलांतर होत असते. पालक स्थलांतरित होत असल्याने बऱ्याच वेळा मुलंही त्यांच्यासोबत जातात. त्यामुळे या मुलांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी व त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पर्यायी काही व्यवस्था करता येतील का या हेतूने उपाययोजना करण्यात येत असून ज्या ठिकाणाहून हे स्थलांतर होते तेथील पालक, त्यांचे नातेवाईक यांच्याशी शिक्षण विभागातील अधिकारी संवाद साधून उपाय करणार आहेत.

मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आमचे प्रयत्न
ऑक्टोबरनंतर मोठ्या प्रमाणात कामासाठी पालक स्थलांतर करतात. ही बाब लक्षात घेऊन मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील शिक्षक पार पाडत. या मुलांचे स्थलांतर रोखावे म्हणून त्यांच्या पालकांची बैठक घेऊन आम्ही संवाद साधणार आहोत. कामायोग्य मुले पालकांसोबत जातात. त्यामुळे अशा मुलांसह त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले जाईल.
-जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी

बातम्या आणखी आहेत...