आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवहारज्ञान:अध्ययन किड्स शाळेत विद्यार्थी बनले भाजी विक्रेते, ग्रीन डे साजरा

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अध्ययन किड्स शाळेत विद्यार्थी बनले भाजी विक्रेते, ग्रीन डे साजरा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पूर्व प्राथमिक वर्गातील मुलांनी भाजी विक्रेत्यांची वेशभूषा करून भाज्याही विकल्या. विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे, भाज्यांची ओळख व्हावी या हेतूने हा उपक्रम घेण्यात अाला. त्रिशा मोरे, आराध्या इंगळे, शिवम जावळे, विधी ठाकरे, देवश्री परिहार, वृंदा सोनटक्के, अध्ययी पवार, आराध्या येलमाटे, मनवा तर्टे, वंश सोनी यांनी भाजी विक्रेत्यांची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्या शालिनी शहा यांनी केले. अश्विनी बेलसरे, स्वाती वरणगावकर, अश्विनी कस्तुरे यांची या वेळी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...