आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभूमीची परंपरा:संस्कृतीचा अभ्यास गांभीर्याने होत नाही : लक्ष्मीकांत धोंड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञानाचे सिद्धांत वेळोवेळी प्रयोग करून मान्य केले जातात, परंतु संस्कृतीचा अभ्यास करण्यात भारतीय माणूस कमी पडतो. आपल्याकडे रंगभूमीची परंपरा ग्रीक रंगभूमीच्या आधीची आहे, परंतु हे सिद्ध करण्यासाठी वेदांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कमी आहे. त्यामुळे आम्ही मागे पडतो, अशी खंत लक्ष्मीकांत धोंड यांनी व्यक्त केली.

गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीत आकाशवाणीचे निवृत्त उद्घोषक ग्रंथ संग्राहक, साहित्यिक अनंत काळे यांच्या कार्याला उजाळा देणारे अनंत स्मृती स्मरणिकेचे प्रकाशन शनिवारी झाले. या वेळी मराठी रंगभूमी दिनानिमित्त “भारतीय रंगभूमीचे प्राचीनत्व’ विषयावर आयोजित व्याख्यानात धोंड बोलत होते. व्यासपीठावर डॉ. छाया महाजन, जयश्री काळे, प्राचार्य प्रदीप जब्दे, डॉ. मकरंद पैठणकर यांची उपस्थिती होती.

विजय रणदिवे आदी मान्यवरांनी अनंत काळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्रकाशक अशोक कुमठेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपाली कुलकर्णी यांनी केले. संपादन डॉ. आरतीश्यामल जोशी, नीता पानसरे, डॉ. अशोक वाकोडकर, अशोक आर्धापुरे, अमृता काळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...