आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूंची माहिती:आयटीआयमध्ये कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र; जुलैपासून डिग्री काेर्स सुरू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयटीआय परिसरात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र जुलै-२०२३ पर्यंत सुरू करण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी मंगळवारी आयटीआयची पाहणी आणि उद्योजकांशी चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.डाॅ. पालकर म्हणाल्या, ‘रोजगार क्षम शिक्षण देऊन आवश्यक मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विद्यापीठाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, बिझनेस इंटेलिजन्स, इनोव्हेशन अँड रोबोटिक्स अभ्यासक्रमांची सुरुवात केली आहे. अभ्यासक्रमात ४० टक्के थिअरी आणि ६० टक्के ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ दिली जाईल.

त्यानंतर उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. यांत्रिकच नव्हे, तर संगणकीय अणि मेकॅट्रॉनिक्स शाखेतील कुशल मनुष्यबळाची औरंगाबादला गरज आहे. नव्या अभ्यासक्रमांची रचना, विद्यापीठासाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती या प्रक्रिया वेगाने केल्या जाणार आहे.

उद्योजकांशी झालेल्या चर्चेनंतर घेतला निर्णय ६ ते ८ महिन्यांत उपकेंद्र कार्यरत होईल. जून, जुलैमध्ये सेंटर सुरू होईल. येथील विद्यार्थ्यांसाठी पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाईल. डाॅ. पालकर यांच्या बैठकीला सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी, मॅजिकचे आशिष गर्दे, उपसंचालक अभिजित आल्टे, कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे, अर्जून गायकवाड, उपप्राचार्य दिलीप वानखेडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...