आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:उपविभागीय अधिकाऱ्याने रस्त्यावर उभे राहून केली वाहतूक सुरळीत, वसपांगरा शिवारात पुलाच्या कामामुळे झाली होती वाहतुक ठप्प

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर वसपांगरा शिवारात पुलाच्या कामामुळे मंगळवारी ता. १५ सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाहतुक ठप्प झाली होती त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. याचवेळी तेथून जाणाऱ्या उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी रस्त्यावर उतरून वाहतुक सुरळीत केली.

हिंगोली ते कळमनुरी या मार्गावर सध्या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून रस्त्याचे तसेच पुलाचे काम सुुर आहे. वसपांगरा शिवारात पुलाचे काम सुरु असल्याने वाहतुक वळण रस्त्याने काढून दिली आहे. त्यासाठी वळण रस्ता देखील काढून देण्यात आला आहे.

मात्र या मार्गावरून हैदराबाद व दिल्लीकडे जाणारी वाहने धावतात. दररोज हजारो ट्रक, तसेच बसेस, चारचाकी वाहने धावतात. त्यामुळे हा रस्ता वर्दळीचा आहे. सध्या या भागात पाऊस झाल्यामुळे वळण रस्त्यावरून हळूवार वाहने नेली जात आहेत. तर त्या ठिकाणी काही अडथळे देखील निर्माण झाले आहेत. वाहने पुढे घेण्याच्या प्रयत्नात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. त्यामुळे हिंगोली व कळमनुरी मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, यावेळी त्या ठिकाणावरून कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे जात होते. वाहतुक ठप्प झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहन बाजूला उभे करून रस्त्यावर उतरून वाहतुक सुरळीत केली. तब्बल अर्ध्यातासानंतर वाहतुक सुरळीत झाली.

त्यानंतर खेडेकर यांनी संबंधित कंत्राटदारास तसेच राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरून संवाद साधला. या वळण रस्त्याच्या जवळ असलेले अडथळे तातडीने दुर करून वाहतुक सुरळीत राहिल याकडे लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...