आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:पाणबुड्यांनी 10 तासांत 10 गळत्या थांबवल्या ; पाच लाख लिटर पाण्याची होणार बचत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेस्टेशन रोड ते वेदांत चौकदरम्यान सिमेंट रस्त्याखाली असलेल्या ७०० मिमीच्या पाइपलाइनला गळती लागली होती. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने पाणबुड्यांच्या मदतीने दहा ठिकाणी असलेल्या गळत्या बंद केल्या. तसेच केमिकलच्या मदतीने २५ जॉइंटची गळती बंद केली. तब्बल दहा तास हे काम चालले. यामुळे पाच लाख लिटर पाण्याची बचत होईल, अशी माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहराला ७०० आणि १४०० मिमीच्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही पाइपलाइन अत्यंत जीर्ण झाल्या असून जागोजागी गळती लागलेली आहे.

रेल्वेस्टेशन येथून आलेल्या पाइपलाइनला वेदांत चौकासमोरच्या भागात गळती लागल्याने तळघरात पाणी साचत असल्याची तक्रार या भागातील घरमालकांनी मनपाकडे केली होती. त्याची दखल घेऊन पाणीपुरवठा विभागाने गळती बंद करण्यासाठी तपासणी केली असता या पाइपलाइनला लिकेजेस नसल्याचे आढळले. त्यामुळे सिमेंट रस्त्याखालून गेलेल्या पाइपलाइनला गळती असल्याचे स्पष्ट झाले. या पाइपलाइनमधील लिकेजेस काढून गळती बंद करण्यासाठी पुणे येथून महाराष्ट्र वॉटर अंडर सर्व्हिसच्या पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले. शुक्रवारी दिवसभर पाइपलाइन बंद ठेवून पाणबुड्यांनी क्रॉस कनेक्शन असलेल्या सातशेच्या पाइपलाइनमधील १० गळत्या केमिकलच्या साह्याने बंद केल्या. त्यासोबतच पाइपलाइनला असलेले २५ जोड मजबूत केले.

५० मीटरपर्यंत शोधले लिकेजेस : वेदांत चौकात मेनव्होलमधून पाणबुड्यांना पाइपलाइनमध्ये उतरवण्यात आले. ऑक्सिजन सिलिंडर सोबत होते. ५० मीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी लिकेजेस शोधून ते बंद केले. दहा तास पाणबुडे पाइपलाइनमध्ये काम करीत होते.

बातम्या आणखी आहेत...