आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपात येत्या मे महिन्यापूर्वी नोकर भरती होणार असून सुरुवातीस सव्वाशे पदे भरतीच्या परवानगीचा प्रस्ताव राज्यसरकारकडे सादर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने अभियंते, सहाय्यक आयुक्त, लिपिक आणि अग्निशमन कर्मचारी या पदांचा समावेश आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेतील मंजूर पदांची एकूण संख्या ५२०२ इतकी आहे. त्यापैकी २२३७ पदे रिक्त आहेत. मे २०२३ पूर्वी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महापालिकेचा आस्थापना खर्च म्हणजेच कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते यावरील खर्च हा एकूण उत्पन्नाच्या ४० टक्के इतका आहे. आस्थापना खर्च मर्यादेपेक्षा जास्त असला तरी विशेष बाब म्हणून १२५ पदे भरण्याबाबत परवानगी मागण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.