आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करा’

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांनी त्रैमासिक विवरणपत्र ई-आर ३० एप्रिलपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. यात अंगीकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तसेच खासगी क्षेत्रातील २५ किंवा अधिक लोक काम करतात, अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखान्यांना सेवायोजना कार्यालये (रिक्त पदांची सूचना देणे सक्तीचे) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १०६० नुसार बंधनकारक आहे. याप्रमाणे नियोक्त्यांचा लॉगिनमध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही तांत्रिक अडचण आल्यास ०२४०-२९५४८५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.