आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:अबॅकसमध्ये प्रथमेश बनसोड, आरुषी सौंदणकर, पूर्वा राजपूतचे यश ; मेडल्स व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथे पार पाडलेल्या गॅमा अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेत औरंगाबादचा प्रथमेश बनसोडने प्रथम पारितोषिक मिळवले. प्रथमेशने पाचव्या लेव्हलमध्ये तीन मिनिटांत ८० गुणाकाराची उदाहरणे सोडवून प्रथम पारितोषिक मिळवले. तसेच आरुषी सौंदणकर आणि पूर्वा राजपूत या दोन्ही विद्यार्थिनींनी अनुक्रमे तिसऱ्या व दुसऱ्या लेव्हलचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. प्रणव तांदळे, तुषार चव्हाण, अर्णव सोंदणकर, व्रतेश सोंदणकर,समृद्धी बागूल यांना उत्कृष्ट सहभागाबद्दल मेडल्स व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे आयोजक गणेश कोटकर यांनी विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरव केला. या विद्यार्थ्यांना ब्रेनेक्स अकॅडमीच्या संचालिका साधना राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंतांना गॅमा अबॅकसचे सीईओ डॉ. के. नागूल नाथन यांनी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...