आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळी ऽ रे ऽ होळी:अशी रंगली राजकीय धुळवड!

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कधी आघाडी, कधी बिघाडी...कधी बाण-कधी चिन्हाचा ताण... राजकारणात गजबजले नेते-कार्यकर्त्यांचे फड, मग

‘कमळा’बाईला शरण जा नाहीतर लागेल साडेसाती एकीकडे ‘ईडी’लिंबू दुसरीकडे ‘छप्पन्न’ इंच छाती

त्यांचा ‘सामना’ बघून ‘ढाण्या’सुद्धा हादरला ‘ठाण्या’च्या भूकंपाचा धक्का बसला ‘दादर’ला

‘चाळीस’ ‘बाण’ निघून गेले थोडे शिल्लक आहेत आता ‘धनुष्य’ म्हणाले ‘मातोश्रीं’ना कसा रिता झाला भाता

‘दादा’ करामतीकरांनी चांगलीच आणली आफत ‘पंतां’ना अस्वस्थ करते अजूनही ‘पहाटे’ची शपथ

‘प्रकाश’किरणे पसरतील याची अपेक्षा नाही किंचित ‘आघाडी’वर राहण्यापासून कोण करणार त्यांना ‘वंचित’?

गाजले नि वाजले तीन ‘तेरा’ ‘राज’कारणात उरला ‘एक’ ‘इंजिन’ म्हणाले यालाच म्हणा ‘ग्यानबाची मेख’!

वळवळ्या जिभेला काल सांगत होती अक्कलदाढ ‘हक्का’चा ‘भंग’ होईल बोलू नको फाडफाड!

पूर्वी टाकायचो लिटरभर आता थेंब थेंब टाकतो ‘अब की बार तीनसौ पार’च्या होर्डिंगने जीव धास्तावतो!

■ अॅड. अनंत खेळकर, अकोला

बातम्या आणखी आहेत...