आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:गटबाजीने त्रस्त काँग्रेस महिला आघाडी शहराध्यक्षांचा राजीनामा, नाना पटोलेंच्या पदयात्रेत बॅनरवर फोटोवरून वाद

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस महिला आघाडी शहराध्यक्ष अंजली वडजे पाटील यांनी नऊ महिन्यांतच गटबाजीला कंटाळून प्रदेशाध्यक्ष संध्या लाखे पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान जाहीर केले. ते भाजपने पूर्णपणे हायजॅक केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या महिन्यात आझादी गौरव यात्रा काढली होती. ती यात्रा औरंगाबादेत आली असताना बॅनरवर फोटो लावण्यावरून वडजे यांचे काही स्थानिक नेत्यांशी वाद झाले. हा प्रकार त्यांनी वरिष्ठांना कळवला आणि दोषींवर कारवाईची मागणी केली. किमान जाब विचारला जावा, अशी त्यांची अपेक्षा होती. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.

विचारधारा पाळत नाही वडजे म्हणाल्या की, वरिष्ठांनी बैठका आयोजित करून आम्हाला हिंमत द्यायला हवी होती. पण तसे काही झाले नाही. पक्षातील लोकच काँग्रेसची विचारधारा पाळत नाहीत. औरंगाबादच्या नामांतराच्या प्रश्नावरून अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. सर्वच राजकीय पक्षांत गटतट असतातच. पण इथे प्रत्येक क्षणाला फक्त गटबाजी पाहायला मिळते.