आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Sugar Conference Pune Shirur | Farmers Must Be Present To End The Arbitrariness Of The Sugar Emperors; Appeal Of Kalidas Apet, Working President Of Farmers Association

3 सप्टेंबरला ऊस परिषद:साखर सम्राटांची मनमानी संपविण्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे; कालिदास आपेट यांचे आवाहन

संतोष देशमुख|औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन साखर आणि इथेनॉल कारखान्यामध्ये हवाई अंतराची अट लादून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना गुलाम केले आहे. साखर सम्राटांची मनमानी वाढली आहे. याविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता, शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर जि.पुणे) येथे रघुनाथ पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ऊस परिषदेला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केले.

कायद्याचे पालन नाही

सन 2013 साली शेतकरी संघटनेच्या ऊस आंदोलनावर पृथ्वीराज चव्हाण सरकारने गोळीबार करून चंद्रकांत नलवडे आणि कुंडलीक कोकाटे हे तरुण शेतकरी मारले. त्यानंतर ऊस दरासाठी आरएसएफचा म्हणजे महसुली उत्पन्नाचा कायदा केला. साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखर, बगॅस, मळी ही उत्पादने विकून येणाऱ्या रकमेतील 70% टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. उर्वरित 30% टक्के रकमेत साखर कारखान्याचे प्रशासन चालवावे, असा कायदा केला. दुर्दैवाने महाराष्ट्रातील एकाही साखर सम्राटाने या कायद्याचे आजपर्यंत पालन केले नाही.

मापात पाप, मग्रुरी वाढली

गुजरातमध्ये ऊसाला प्रतिटन सुमारे 4 हजार रुपये, उत्तरप्रदेशात प्रतिटन 3500 रुपये, पंजाबमध्ये प्रतिटन 3650 रुपये मिळत असताना आपल्याकडे उसाला केवळ प्रतिटन 1500 ते 2000 रुपये साखर सम्राट देत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना सन 2014 साली विश्वासमतावेळी सर्व राजकीय पक्षांच्या साखर सम्राट आमदारांनी मतदान केल्याने देवेंद्र फडणवीसांनी सलग पाच वर्षे आरएसएफ देण्याकडे दुर्लक्ष केले. उध्दव ठाकरेंनी तर साखर कारखान्यासोबत दोन इथेनॉल कारखान्यालाही हवाई अंतराची अट घातली. मागील दहा वर्षांत महाराष्ट्रात एकही नवीन साखर किंवा इथेनॉलचा कारखाना उभारला नसल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न तयार झाला. साखर सम्राटांची मुजोरी आणि मग्रुरी वाढली.

तोंड दाबून बुक्क्याचा मार

साखर सम्राटांनी उसात काटामारी केली. वजन आणि रिकव्हरी चोरली. ऊस तोडणी कामगारांनी शेतकऱ्यांना त्रास दिला. प्रचंड लुटमार केली. ट्रॅक्टर, ट्रक ड्रायव्हरनी मनमानी करून एन्ट्री वसुली केली. मार्च 2022 नंतर ऊस घालविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास, अपमान सहन करावा लागला. ऊस जाऊन सुध्दा हातात काहीच पडले नाही.

बातम्या आणखी आहेत...