आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील सर्व तालुक्याच्या तुलनेत पैठण तालुक्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. मागील दोन वर्षे अतिरिक्त उसाचा प्रश्न महाराष्ट्र निर्माण झाला होता. त्यामुळे या वर्षी नवीन उसाचे क्षेत्र वाढले नाही. पैठणमध्ये यंदा १८ लाख मेट्रिक टन उसाचे क्षेत्र आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे चेअरमन असलेला विहामांडवा येथील रेणुकादेवी शरद कारखाना व संत एकनाथ सहकारी कारखाना या दोन्ही कारखान्याने प्रतिटन २,२०० भाव दिला. पण पश्चिम महाराष्ट्रात २४०० रुपयांच्या पुढे भाव मिळणार असल्याने शेतकरी तिकडे ऊस देण्यास जास्त उत्सुक आहेत. यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनणार नसल्याची माहिती शेतकरी नेते माउली मुळे यांनी दिली.
यंदा पैठण तालुक्यात कन्नड, छत्रपती संभाजी कारखाना, भेंडा, गंगामई, गुळमेश्वर, केदारेश्वर, सोनाई, बारामती अॅग्रा, जय भवानी सहकारी साखर कारखान्यासह १४ कारखान्याच्या ऊसतोड टोळ्या पैठण तालुक्यात दिवाळीपासून दाखल झाल्या आहे. तालुक्यात निम्म्याहून अधिक ऊसतोड झाली आहे. यंदा अतिवृष्टीने उसाची वाढ घटली असताना ऊस वेळेत जाणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने पुढे येत आहेत. दिवाळीपासून तालुक्यातील सहा कारखान्याने व त्यानंतर ८ कारखाने उसाच्या टोळ्या टाकल्या आहेत. यात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळत होईल, असे शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले. पैठण तालुक्यातील दोन्ही कारखान्याने २२०० रुपये भाव दिला. त्या तुलनेत प. महाराष्ट्रातील कारखाने २,४०० रुपये भाव दिला असल्याची माहिती शेतकरी किशोर दसपुते यांनी सांगितले.
यंदा गाळपाचा प्रश्न नाही तालुक्यातील मागच्या वर्षी ऊसतोडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला हाेता. त्या वेळीदेखील बाहेरच्या कारखाने मोठ्या प्रमाणात ऊस नेण्यात आला. आतादेखील पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जात असल्याने यंदा तरी गाळप प्रश्न निर्माण होणार नाही, अशा आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
गाेदावरी पट्ट्यात वाढले उसाचे क्षेत्र : पैठण तालुक्यात व औरंगाबाद, बीड, जालना या भागात जायकवाडीच्या डाव्या कालव्याने व गोदावरी नदीच्या पट्ट्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. यातून दरवर्षी गोदावरी पट्ट्यातच १ लाख हेक्टरवर क्षेत्रात उसाची लागवड होते. यंदादेखील १ लाख हेक्टरहून अधिक ऊस याच पट्ट्यात असल्याचे संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.