आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक!:बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने परीक्षेच्या तणावातून घेतला गळफास; औरंगाबादेतील शंभूनगर येथील घटना

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीत शिक्षण घेणाऱ्या 18 वर्षीय तरुणीने परीक्षेच्या तणावातून घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 3 जानेवारी (गुरुवार) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. उषा कृष्णाचंद्र चौधरी (18 रा. शंभूनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.

उषा ही देवानगरी परिसरातील एका महाविद्यालयात शिकत होती. तिचे वडील कृष्णाचंद्र हे फरशी बसवण्याचे काम करतात, तर आई घरकाम करते. तिला एक लहान भाऊ आहे. उषाला डॉक्टर व्हायचे होते, त्यासाठी ती तयारी करत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. गुरुवारी उषाचे वडील नियमित कामासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास लहान भाऊ बाहेर खेळत असताना उषाने आईला पेपर आणण्यासाठी दुकानात पाठवले.

आई घराबाहेर जाताच उषाने घरातील फॅनच्या हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळानंतर आईने घरी येऊन दार उघडून बघितले असता उषा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हे पाहून आईला धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्याने शेजार धावून आले. त्यांनी उषाला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, उषाने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली असा अंदाज नातेवाइकांनी वर्तवला आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार वाय. एस. डफळ करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...