आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामित्राला कॉल करून आत्महत्या करत असल्याचे सांगून हर्सूल तलावात उडी मारलेल्या कुणाल काकासाहेब देहाडे (१९) या तरुणाचा मंगळवारी मृतदेह सापडला. शनिवारपासून अग्निशमन विभाग मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. आत्महत्येच्या दिवशी त्याने इन्स्टाग्रामवर ‘आपको हमारे जैसे हजार मिलेगे, पर उन हजारो में हम नही,’ असे वाक्य पोस्ट केले होते.
सिटी चौक परिसरातील सराफा गल्लीत राहणारा कुणाल महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याच्या वडिलांचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. कुणाल त्याच्या वडिलांना व्यवसायात मदत करत होता. त्याला दोन मोठे भाऊ आहेत. १ जानेवारी रोजी त्याने दुपारी १ वाजता जवळच्या मित्राला कॉल करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले.
घाबरलेल्या मित्राने तत्काळ कुणालचे घर गाठत त्यांना प्रकार कळवला. मात्र, तोपर्यंत कुणालने दुसरा कॉल करून मी हर्सूल तलावाजवळ उभा असून हे आपले शेवटचे बोलणे असेल, असे सांगून मोबाइल बंद केला. तेव्हापासून अग्निशमन विभागाचे जवान त्याच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.
मंगळवारी साडेसात वाजता त्याचा मृतदेह सापडला. अग्निशमनचे संग्राम मोरे, शेख इसहाक, शिवसंभा कल्याणकर, दिनेश मुंगसे, प्रसाद शिंदे, छगन सलामाबाद, परेश दुधे, सुजित कल्याणकर, मयूर कुमावत, मोहम्मद मुजफ्फर, योगेश दुधे, मोहम्मद दुशाज, शेख आसेफ यांनी ही कारवाई पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.