आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:कौटुंबिक वादातून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, पोलिसांत रविवारपासून बेपत्ताची नोंद

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौटुंबिक वादातून रविवारपासून बेपत्ता झालेल्या सुनंदा गुणाजी भेसर (२९) या विवाहितेचा मंगळवारी घराजवळील विहिरीत मृतदेह आढळला. ही घटना मांडकी गावात उघडकीस आली.

मूळ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील सुनंदा यांचा मांडकीतील गुणाजीसोबत २०११ मध्ये विवाह झाला होता. त्यांना सात वर्षांची मुलगी व तीन वर्षांचा मुलगा आहे. सुनंदा व गुणाजींचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, रविवारी दुपारपासून सुनंदा बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोध घेऊनही ती आढळून आली नाही. त्यामुळे कुटुंबाने चिकलठाणा पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद केली. सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी पथकासह शोध सुरू केला. घरातील वादानंतर बेपत्ता झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येच्या संशयावरून विहिरीत शोध सुरू केला असता, सुनंदाचा मृतदेह आढळून आला. चिकलठाणा पोलिस तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...