आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कजबा गल्ली भागात राहणाऱ्या एका २८ वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.१५ बुधवारी दुपारी उघडकीस आली. सुनील दत्तू ढगे (२८) असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी सुनील ढगे यांने विषारी औषध प्राशन केले. या घटनेचा त्याने व्हीडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केला.
हा व्हिडीओ नातेवाईक व ओळखीच्या लोकांनी बघताच त्याचा तात्काळ शोध घेण्यात आला. येथील अंजना पळशी मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यालगत सांडव्यात गट नं ५३० मध्ये तो अत्यवस्थ स्थितीत आढळला. नातेवाईकांनी तात्काळ त्याला पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.