आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारांजणगाव शेणपुंजी येथील शिवनेरी कॉलनीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने औरंगाबाद-नगर महामार्गावर असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आकाश संतोष बनसोडे (२५, मूळ रा. वरखेडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली) असे मृताचे नाव आहे.
दीड वर्षापूर्वी पुणे येथील एका खासगी कंपनीत काम करताना आकाश व पूनमची भेट झाली होती. पूनम मध्य प्रदेशची मूळ रहिवासी होती. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी घरच्यांचा विरोध डावलून २० ऑक्टोबर २०२१ रोजी पुणे येथे लग्न केले. लग्नानंतर आकाशच्या घरच्यांनी दाेघांना स्वीकारून गावी नेले. तिथे महिनाभर राहिल्यानंतर हे दांपत्य औरंगाबादेत आले. ते रांजणगावात राहू लागले. आकाश वाळूजच्या एका केमिकल कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पूनम व आकाशमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यातूनच पूनमने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत मारहाण करणाऱ्या आकाशविरोधात तक्रार दिली होती. तसेच ती माहेरी निघून जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. त्यानंतर वैफल्यग्रस्त आकाशने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.