आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वेतन मिळत नसल्याने शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, शाळेला अनुदान नसल्याने वेतन रखडले

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्री झोपण्यासाठी शेतावर जात असल्याचे सांगून घेतला गळफास

हिंगोली तालुक्यातील उमरा वाबळे येथे आठ वर्षांपासून विनाअनुदानित शाळेवर कार्यरत शिक्षक त्र्यंबक सीताराम वाबळे (३४) यांनी वेतन मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

वाबळे यांचे एमए बीएड (इंग्रजी) शिक्षण झाले होते. ते मागील आठ वर्षांपासून हिंगोली तालुक्यातील इंचा येथील गुरुदास कामत विद्यालयात कार्यरत होते. मात्र या शाळेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे वेतन मिळण्याचा प्रश्नच नव्हता. अनुदान नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली होती. दरम्यान, सोमवारी रात्री आठ वाजता झोपण्यासाठी शेतावर जात असल्याचे सांगून वाबळे यांनी आंब्याच्या झाडाला गळफास घेतला.

२० टक्के अनुदान मंजूर, पण निधी दिला नाही

शासनाने या शाळेला २० टक्के अनुदान मंजूर केले आहे. मात्र अद्यापही निधी नाही. अनुदान मंजूर झालेल्या शाळांना निधी देण्याबाबत आदेश काढण्याची मागणी शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे.