आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्ञानयज्ञ फाउंडेशन आयोजित पद्म महोत्सवाची सांगता दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केली. या वेळी त्यांनी उद्योग, तरुणाई आणि स्वत:चा जीवनप्रवास यावर भाष्य केले, त्याचा हा वृत्तांत त्यांच्याच शब्दांत….
नोकरीतच नव्हे तर उद्योगातही अपयश येते, त्यामुळे आत्महत्या हा काही पर्याय नाही. स्पर्धेचे युग वेगवान आहे. त्यामुळे आपल्याला स्पर्धेसोबतच मानसिक-भावनिक स्थैर्यासाठीही स्वत:ला तयार केले पाहिजे. शिक्षणासोबतच आता मानसिक शांतीसाठीही अभ्यासवर्ग घेतले पाहिजेत. आम्ही जम्मूमध्ये ‘आनंदम’ नावाने एक उपक्रम सुरू केला आहे. त्याचे उत्तम परिणाम दिसत आहेत. इतर संस्थांनीही यासाठी विचार केला पाहिजे.
प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात. त्याशिवाय आयुष्यात गंमतही येत नाही. कष्ट करायची तयारी असेल तर अडचणींवर मात करता येते. त्यामुळे तरुणांनी अडचणींचा विचार न करता उद्योग क्षेत्रात यावे. कधी नव्हे इतकी उत्तम इकोसिस्टिम सध्या देशात उभी झाली आहे. मी २५ हजारांत उद्योग उभा केला : मी स्वतः सुरुवातीला २५ हजारांच्या भांडवलात उद्योग-व्यवसाय सुरू केला. त्यासाठी दोन वर्षे नोकरी करताना केलेली बचत माझ्या उद्योगासाठी वापरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुधारणावादी असण्यासोबतच अर्थतज्ज्ञही होते. त्यांच्या अर्थशास्त्रीय लेखनाची प्रेरणा घेऊन प्रॅक्टिकल इकॉनॉमिस्ट स्टँडअपचा प्रवास सुरू झाला. १९९० या दशकापासून इंटरनेटची सुरुवात झाली. बाबासाहेबांचे विचार आणि मूळ लेखन आपण इंटरनेटच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, ही भावना मनात निर्माण झाली. ६ डिसेंबर २००१ रोजी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयामध्ये वेबसाइटचे उद्घाटन झाले. २००६ मध्ये या वेबसाइटची लिमका बुकमध्ये नोंद झाली. या वेबसाइटने माझ्या जीवनाला नवी कलाटणी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.