आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:एकाच ओढणीने गळफास घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या, अंबाजोगाईतील धक्कादायक घटना

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई तालुक्यातील राजेवाडी येथील २४ वर्षीय तरुण आणि १८ वर्षीय तरुणीने झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

अनिता शेषेराव राठोड (वय १८) आणि प्रवीण सुधाकर काचगुंडे (वय २४) रा. राजेवाडी, ता. अंबाजोगाई अशी दोघांची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार अनिता आणि प्रवीण हे दोघेही आपापल्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी सकाळी अंदाजे राजेवाडी शिवारातील गायरानाच्या उतारावरील लिंबाच्या झाडाला एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास काही ग्रामस्थांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...