आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:कर्जापायी एका शेतकऱ्याची आत्महत्या; युवकाचा गळफास

गंगापूर/ सिल्लाेड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वाहेगाव येथे कर्जबाजारीपणा, कापसाला भाव न मिळणे व २ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे अशोक भिका शिरसाठ (रा. वाहेगाव ता. गंगापूर) या शेतकऱ्याने बुधवारी रात्री शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. शिरसाठ यांच्यावर खासगी व्यक्तींचे कर्ज झाले होते. गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तर दुसऱ्या घटनेत सिल्लोड तालुक्यातील मोढा (खुर्द) येथील रामेश्वर शिवाजी साळवे (२३) या युवकाने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (९ मार्च) सकाळी उघडकीस आली. या घटनेची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...