आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपाशीचे नुकसान:गोलवाडीत शेतकऱ्याची आत्महत्या ; पीक वाहून गेल्याने आर्थिक तणावामुळे घेतला गळफास

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिनाभरापूर्वी झालेल्या पावसात शेतीचे अतोनात नुकसान होऊन आर्थिक तणावाखाली गेल्याने अल्पभूधारक शेतकरी दौलत नंदू सलामपुरे (३९) यांनी रविवारी मध्यरात्री घरात सीलिंग फॅनला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी औरंगाबाद-नगर रस्त्यावरील गोलवाडी शिवारात उघडकीस आली. सलामपुरे यांची गोलवाडी गावाजवळच शेती असून कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. त्यांनी यंदा शेतात कपाशीचे पीक घेतले असून ते चांगले आले होते. मात्र, महिनाभरापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यात कपाशीचे पीक पिवळे पडून वाया गेले. तेव्हापासून सलामपुरे तणावाखाली होते. त्यांची कुटुंबातील इतर सदस्यांनी समजूत काढली. त्यामुळे त्यांनी उसाचे पीक घेण्याची तयारी सुरू केली होती. तरीदेखील ते काही दिवसांपासून गावात कोणाशीही संवाद साधत नव्हते.

ते रविवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण करून खोलीत झोपले. मात्र, मध्यरात्रीतून त्यांनी गळफास घेतला. सोमवारी सकाळी ते खोलीबाहेर न आल्याने नातेवाइकांनी जाऊन पाहिले असता ते लटकलेल्या अवस्थेतच आढळले. ग्रामस्थांनी त्यांना फासावरून उतरवून घाटीत दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर सलामपुरे यांचा मृतदेह कुटुंबाकडे दिला. त्यांच्या पश्‍चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, तीन मुले आहेत. याप्रकरणी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.

बातम्या आणखी आहेत...