आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:बारावी परीक्षेत नापास झाल्याने सेलूतील विद्यार्थ्याची आत्महत्या

परभणीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बारावी परीक्षेत नापास झाल्याने एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.४ ) दुपारी ३ वाजेच्या सुमारास सेलू शहरातील गणेशनगर भागात घडली.

सेलू येथील गणेशनगरातील शंतनू भाऊसाहेब चव्हाण हा बारावी परीक्षेत नापास झाला. निकाला लागल्यापासून तो नैराश्यात होता. त्यातूनच ४ ऑगस्ट रोजी राहत्या घरी रुमालाच्या सहाय्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराचवळ झाला गणेशचा आवाज येत नसल्याने दरवाजा तोडून आत पाहिले असता त्याचा मृतदेह आढळला. या प्रकरणी सेलू ठाण्यात नोंद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...