आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:शिऊर येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या ; कर्जबाजारीपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेती पिकासाठी घेतलेले कर्ज परत फेडू न शकल्याने एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. ८ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. बाबूराव संताराम आहेर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत बाबूराव आहेर यांची वैजापूर तालुक्यातील पेंडेफळ येथे दोन एकर शेतजमीन आहे. या शेतात कष्ट करून ते आपली व आपल्या कुटंबाची उपजीविका भागवत होते. त्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम निर्धारित कालावधीत फेड करू न शकल्याने बँकेने त्यांचा मागे तगादा लावला असल्याचे बोलले जात आहे. हतबल होत बाबूराव आहेर यांनी बुधवारी आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी पेंडेफळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा पश्चात पत्नी, वडील, दोन मुले, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. भारतीय सैन्यदलाचे माजी सैनिक संताराम आहेर यांचे ते चिरंजीव होत.

बातम्या आणखी आहेत...