आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:आर्थिक विवंचनेतून तरुणाची आत्महत्या, पगारवाढीसह प्रमोशनचे आमिष दाखवून साहेबांनी घेतले 80 हजार

खामगाव (औरंगाबाद)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री तालुक्यातील कविटखेडा येथील शिवनाथ सखाराम कोलते (२४) या तरुणाने आर्थिक विवंचनेतून शनिवारी आत्महत्या केली. औरंगाबादच्या बजाज ऑटोअंतर्गत नील ऑटो प्रा. लि. कंपनीत असलेल्या या तरुणास प्रमोशन व पगारवाढ देतो म्हणून मॅनेजरने ८० हजार रुपये घेतले. परंतु निराशा पदरी पडली. दुसरीकडे, साहेबाला दिलेल्या पैशाचे व्याज वाढत असताना देणेदारांचा तगादा सुरू होता. या नैराश्यातून शिवनाथने सोशल मीडियावर पोस्ट टाकत शनिवारी सकाळी ९:३०च्या सुमारास विहिरीत उडी घेतली. ‘माझ्या आत्महत्येस पूर्णपणे कंपनीतील मॅनेजर मनोज पवार हे कारणीभूत आहेत. ते मला मागील २ वर्षांपासून पगारवाढ व प्रमाेशनचे आश्वासन देत हाेते,’ असे शिवनाथ याने संदेशात म्हटले आहे.

शिवनाथ ज्या कंपनीत कामाला होता त्या कंपनीतील कर्मचारी या घटनेनंतर संतापले. दोषी मॅनेजर पवार यांच्यावर कारवाई करा व नंतरच मृतदेह ताब्यात द्या. आम्ही कंपनी युनियनसह कंपनी गेटवर नेऊन कार्यवाहीसाठी कंपनीस वेठीस धरू किंवा आरोपीस तत्काळ अटक करून हजर करा, या मागणीसाठी फुलंब्री येथे औरंगाबाद-जळगाव मार्गावर काही वेळ कर्मचाऱ्यांनी रस्ता अडवला. पोलिसांनी पवार यांना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना केल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...