आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:हळद लागण्यापूर्वीच उमरी येथे तरुणीची आत्महत्या; 14 फेब्रुवारीला होता विवाह, त्याआधीच संपवले जीवन

नांदेड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहत्या घरात गळफास घेऊन संपवले जीवन

हळदीचा मांडव लागण्यापूर्वीच तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उमरी येथील व्यंकटेशनगर येथे गुरुवारी (दि.११) रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली. दुर्गा संजय काचावार (२०) असे मृत नववधूचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

उमरी येथील किराणा दुकानदार संजय काचावार यांची दुर्गाही एकुलती एक मुलगी असून तिचा १४ फेब्रुवारी रोजी विवाह होणार होता. दरम्यान, बुधवारी (ता.१०) दिवसभर वधू तिचे आई-वडील, चुलती आणि परिवारातील इतर सदस्यांनी खरेदी केली होती. गुरुवारी अमावास्या असल्याकारणाने एक दिवस हळदीचा मंडप टाकायचा हे ठरवले होते. त्याप्रमाणे मंडपासाठी लागणारे सर्व साहित्य आणून ठेवले होते. तसेच परत राहिलेली खरेदी करण्यासाठी इतर मंडळी घराबाहेर पडली होती. दुर्गा व तिचे वडील हे दोघेच घरात थांबले होते. वरच्या मजल्यावर दुर्गाने गळफास घेतल्याचे वडिलांना दिसले. उमरी ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...