आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैजापूर:कौटुंबिक कलहातून पिता-पुत्राची आत्महत्या, वैजापूर तालुक्यातील गोयेगाव येथील प्रकार

वैजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथे शेतकरी कुटुंबातील गृहकलह विकोपाला गेल्यामुळे पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. कैलास अप्पासाहेब मोटे (५५), सुरेश कैलास मोटे (२३, दोघेही रा. गोयेगाव) अशी बाप-लेकाची नावे आहेत.

कांगोणी शिवारातील मोटे कुटुंबाच्या शेतीत कांद्याची लागवड केलेली आहे. कांद्याला पाणी देण्यासाठी ड्रिप किंवा स्प्रिंकलर संच घेण्याचा आग्रह मुलगा सुरेश यांनी वडिलांकडे केला. वडिलांनी कांदा लागवड करण्यासाठी मोठा आर्थिक खर्च झाल्यामुळे ही मागणी धुडकावून लावली. यावरून दोघांत शाब्दिक चकमक झडली. या कारणावरून रागाच्या भरात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे वडील कैलास यांनीही विषारी औषधाचे सेवन करून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser