आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:औरंगाबादच्या सुमित महाजनचा युपीएससी परीक्षेत 214 तर नेहा किर्दकचा 383 रँक

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

स्पर्धा परीक्षेकडे फक्त परीक्षा म्हणून न पाहता आपल्यातील क्षमता ओळखून नियोजन करणं आवश्यक आहे. युपीएससी परीक्षा ही खूप अवघड नाही. सर्व साामान्य बुद्ीमत्तेचे व्यक्ती देखील ही परीक्षा जिद्दीने यशस्वी होवू शकतात. त्यासाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही. संयम ठेवून नियोजन करा. असे मत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरलेल्या नेहा किर्दक आणि सुमित महाजन या मंगळवारी जाहिर झालेल्या युपीएससी परीक्षेतील यशस्वी तरुणांनी असे मत व्यक्त केले.

नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (युपीएससी) मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड झाली आहे.

लाखो उमेदवार ज्यांना आयएएस, आयपीएस अधिकारी व्हायची इच्छा असलेले तरुण-तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात. ही परीक्षा देशातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षा मानली जाते. यंदा या निवड झालेल्या उमेदवारांपैकी ३०४ जनरल कॅटेगिरीतील, ७८ (ईडब्ल्यूएस), २५१ ओबीसी, १२९ अनुसूचित जाती आणि ६७ अनुसूचित जमाती कॅटेगिरीतील आहे. औरंगाबाद शहरातील नेहा लक्ष्मण किर्दक ही तरुणी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत यशस्वी ठरली असून, तिचा ३८३ वा रँक आला आहे. तर सुमित राजेश महाजनने २१४ वा रँक मिळवला असून, त्याचा हा अखेरचा अटेंम्पट होता.

औरंगाबादची नेहा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी

शहरातील नेहा लक्ष्मण किर्दक हिचा ३८३ रँक आला आहे. दिव्य मराठीशी बोलतांना नेहाने सांगितले की, तिचा हा पहिलाच प्रयत्न होता. तिने कुठेही क्लासेस न लावता सर्व तयारी ही ऑनलाइन केली होती. नेहा एमबीबीएस असून, लहान पणापासून सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न होते. बाबांचे देखील स्वप्न होते. आज त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करु शकले याचा आनंद आहे. आज मिळालेले श्रेय हे माझे आई-बाबांमुळे आहे. माझ्या अभ्यासाचे नियोजन व्हावे म्हणून स्वत:च काम थांबवून बाबांनी त्यांची पाच वर्ष माझ्यासाठी पूर्ण वेळ दिला. मी सुरक्षित रहावे, अभ्यासची नीट तयारी करावी यासाठी ते कायम माझ्या सोबत असतं असे नेहा म्हणाली. गर्व्हमेंट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झालेल्या नेहाचे शालेय शिक्षण हे शारदा मंदिर कन्या प्रशालेतून झाले आहे. नेहाची आई आशा किर्दक या शिशु विहार शाळेत शिक्षक आहेत. आज मोठ्या प्रमाणात मेडिकल आणि इंजिनिअरिंग केलेले तरुण स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत. याविषयी नेहा म्हणाली की मेडिसन इज नॉट कंम्प्लिट स्लयूशन असं मला वाटत. मी डॉक्टर म्हणून जीव वाचवेल. परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या हाती भविष्य वाचविण्यासाठी सुधारणा करण्याचे काम आहे. त्यामुळे आवडीने मी २०१८ मध्ये युपीएससीची तयारी सुरु केली होती. युपीएससी खूप अवघड नाही. अभ्यासाचे नियोजन हवं. ते मी कॉलेज करतांनाच केले. रोज सात ते आठ तास नियमित वर्षभर अभ्यासासाठी वेळ देण आवश्यक आहे. मी ८० टेस्टचा सराव प्रिलियमपूर्वी केला होता. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही. तुमच्यात जिद्द आणि नियोजन हवे. तुम्ही कुठे कमी आहात यावर लक्ष द्या ध्ययेय विसरता कामा नये असेही नेहा म्हणाली. आता आयपीएस किंवा आयआरएस मिळू शकते पण माझी आवड ही आयपीएस आहे असेही नेहा म्हणाली. युपीएससी टॉपर झालेल्या नेहाला पेंंटींग, कवीता लेखन, डायरी लेखन आणि ब्लॉग लिहिण्याची आवड आहे.

चुकांमधून शिकलो संयम हवा - सुमित महाजन

स्पर्धा परीक्षेकडे केवळ स्पर्धा परीक्षा म्हणून पाहू नका. आपल्यातील उणीवांवरही लक्ष देवून त्या चुका दुरुस्त करा. कोणत्याही यशासाठी संयम खूप आवश्यक आहे. माझा हा शेवटचा अटेंप्मट होता. मी तीनवेळा मुलाखतीला सामोरे गेलो तर सहा वेळा लेखी परीक्षा. थोड्या थोड्या गुणांनी संधी जात होती. नाराज होत होतो पण खचलो नाही. जिद्दीने संयम बाळगत चुकांमधून शिकलो त्यामुळेच आज हे यश मिळाल्याचे मत, शहरातील सुमित महाजनने दिव्य मराठीशी बोलतांना व्यक्त केले. त्याचा २१४ वा रँक आला आहे. सुमितने व्हीजेटीआयमधून बीटेक केले आहे. तर त्याचे शालेय शिक्षण हे संत मीरा विद्यालयातून झाले आहे. कॉलेज कँम्पस मध्ये नोकरीची संधी मिळाली होती. पण माझी इच्छा खुनावत होती. मी स्पर्धा परीक्षांची तयारी सुुरु केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना सुरुवातीला फारसा अंदाज येत नाही. पण तयारी करतांना तुमचा ग्रृप देखील चांगला हवा. माझी सर्व परीक्षेची तयारी मी पुण्यात केली. आठ ते दहा तास अभ्यासक करायचो. तो अभ्यास हा क्वॉलिटी प्रिपरेशन होता. सुरुवातीला काही चुका झाल्या होत्या. त्यामुळे एक दोन गुणांनी संधी हुकली माझी मुलाखतीची ही तिसरी वेळ होती. शेवटचा अटेंम्पट होता. त्यामुळे निकालाकडे लक्षही होते. लॉकडाऊनमुळे प्रक्रिया लांबेल असे वाटले होते. कारण माझा इंटरव्ह्यूव्ह हा फेब्रुवारीत झाला आणि काहीच्या मुलाखतीचे वेळापत्रक थांबवले होते. पण आज निकाल आला. नियोजनामुळे आणि चुकांवर काम केल्यामुळे हे यश मिळाले आहे. असेही सुमित म्हणाला. क्रिकेटची, तबल्याची आवड असलेल्या सुमितला एम.एस. धोनी आवडतो. त्याचा खेळ हा प्रोत्साहित करत असल्याचेही तो म्हणाले. स्पधा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी नियोजन, संयम आणि चुकांवर काम करण्याची तयारी ठेवावी. असेही सुमित म्हणाला. सुमितचे वडिल राजेश महाजन हे जि.प. शिक्षण विस्तार अधिकारी असून, आई ग्रृहिणी आहे. त्याला एक भाऊ आणि एक बहिण आहे.

अंकिता वाकेकर
अंकिता वाकेकर

औरंगाबादची अंकिता देशात 547 व्या स्थानी

सिव्हिल इंजिनिअर असलेल्या अंकिता अरविंद वाकेकर हिला युपीएससीमध्ये ५४७ वा रँक मिळाला आहे. मुळ औरंगाबादची असलेल्या अंकिताचे शिक्षण हे नाशिक मध्ये झाले असून, सिव्हिल इंजिनिअरिंग व्हिजेटीआय मुंबई येथून केले आहे. सध्या नाशिक येथेच रहायला आहे. असलेल्या अंकिताने युपीएससीची संपूर्ण तयारी दिल्लीत केल्याचे दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले हा आपला तिसर अटेंम्ट होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना संयम आणि नियोजन आवश्यक आहे. असेही अंकिता म्हणाली. अंकिताची आई ही नायाब तहसीलदार असून वडिल इंजिनिअर आहेत.

यूपीएससीत यश संपादन केलेले मराठवाड्यातील उमेदवार

मंदार पत्की/ बीड/22

निलेश गायकवाड लातूर/752

वैभव वाघमारे बीड /771

असित कांबळे/उस्मानाबाद/651

सुमित महाजन / औरंगाबाद/ 214

श्रेणीक लोढा /बीड/221

बातम्या आणखी आहेत...