आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयाकडून १० गरजूंना मोफत श्रवण यंत्र वाटप करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेचे हे ७५ वे वर्ष आहे. या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्य सरकारच्या आदेशानुसार ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम ७ ते १४ एप्रिलदरम्यान हाती घेतला असून तो १४ संस्थांमध्ये राबवणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांनी दिली.
‘सुंदर माझा दवाखाना’ या उपक्रमात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयांचा सहभाग असणार आहे. या उपक्रमाचे शुक्रवारी, ७ एप्रिल रोजी उद्घाटन झाले. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी १० गरजू व्यक्तींना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. या वेळी संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक डॉ. जावेद कुरेशी यांनी लाभार्थींना श्रवण यंत्र वापरासंदर्भात माहिती दिली.डॉ. धमाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. मरकड यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी डॉ. काकड, ऑडिओलॉजिस्ट डॉ. विश्वजित सोनटक्के, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.