आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलदुतांचे काम कौतुकास्पद:बारव संवर्धनासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मदत करणार; जलदूतांसह देवगिरी बँकेचेही श्रमदान

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समर्थनगरातील बारव स्वच्छ करण्यासाठी रविवारी पहाटे 6.30 वाजता श्रमदान केले.यावेळी मा. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी, नागरिकांनी जागरुक राहून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन केले. शहरातील अनधिकृत नळ, मुख्यजलवाहिनी वरील नळांवर प्रशासन कठोर कारवाई करीत असल्याचे सांगितले.

जलसंवर्धनसाठी देवगिरी बँक, जलदूत अश्या अनेकांची प्रशासनाला साथ हवी आहे, यासाठी युवकांनी पुढे यावे अशी नागरिकांना साद घातली. बारव संवर्धन विषयासाठी प्रशासन सर्व मदत करतील आश्वासनही सुनील चव्हाण यांनी दिले.

जलदुताचे काम कौतुकास्पद

माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी, देवगिरी बँक व जलदूतांचे कौतुक करुन यापुढे या बारवेची सर्व काळजी आम्ही स्थानिक नागरिक घेऊ असे सांगितले. या उपक्रमा अंतर्गत भारतीय सांकृतीचा उत्तम नमुना असलेल्या शहरांतील ऐतिहासिक बरवाचे जतन करण्यात येत आहे. या अभियानात आज समर्थ नगर येथील बारवेच्या स्वच्छतेने झाली.

आम्ही कृती करणार

सतत औरंगाबर शहराच्या पाणी प्रश्नावर वायफळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतूनच त्यावर उपाय करता येऊ शकतात असे प्रास्तविक करताना- जलदूत किशोरदादा शितोळे यांनी देवगिरी बँक व जलदूत संस्थेच्या माध्यमातून शहरातील, जिल्ह्यातील बारवांचे संवर्धन केले. बोअरवेल पुनर्भरण करीत आहोत याची माहिती दिली, तसेच हा भारतीय संस्कृतीचा वारसा सर्वांना अभिमानाने जपण्याचे महत्व विशद केले.यावेळी देवगिरी बँक फिटनेस क्लबचे सदस्य, जलदूतचे स्वयंसेवक, नागरिक असे 150 जण उपस्थित होते सुनील चव्हाण व मा सहाय्यक पोलिस उपायुक्त बालाजी सोनटक्के, समीर राजूरकर, सिद्धार्थ साळवे, यांनी प्रत्यक्ष श्रमदान करुन कचरा, गाळ काढण्याच्या कामात भाग घेतला.

डॉ. अभय कुलकर्णी, सहाय्यक पोलिस आयुक्त श्री.बालाजी सोनटक्के, माजी नगरसेवक श्री.समीर राजूरकर , श्रीकांत उमरीकर, भाग संघचालक देवेन्द्र देव, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, उपाध्यक्ष प्रा संजय गायकवाड, संचालक जयंत अभ्यंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रविन नांदेडकर जयंत देशपांडे, अमृता पालोदकर , मनाली कुलकर्णी, यासह अनेकांची उपस्थिती होती

बातम्या आणखी आहेत...