आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:देयक मंजूरीसाठी पाच हजाराची लाच घेणाऱ्या वेतन पथक व भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातील प्रभारी अधिक्षकास रंगेहाथ पकडले

हिंगोली6 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोलीत सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्त्याचे देयक मंजूरीसाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील प्रभारी अधिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी ता. १९ दुपारी रंगेहात पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हयातील खाजगी शाळांमधील शिक्षकांचे वैद्यकिय प्रतिपुर्तीची देयक, रजा व इतर देयक मंजूर करण्यासाठी वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे पाठविले जाते. त्यानुसार तक्रारदाराचे देयक मंजूरीसाठी या कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. सदर देयक मंजूरीसाठी प्रभारी अधिक्षक भगवंत प्रशांत कपाळे याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. सदर रक्कम आज देण्याचे ठरले होते.

त्यानंतर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी उपाधिक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफुने, जमादार विजयकुमार उपरे, रुद्रा कबाडे, विनोद देशमुख, अवि किर्तनकार, प्रमोद थोरात, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे, माधव बुरकुले, हिंमतराव सरनाईक यांच्या पथकाने सापळा रचला होता. ठरल्यानुसार आज दुपारी अडीच वाजता सदर रक्कम देण्यासाठी तक्रारदार कार्यालयात गेेले. त्यावेळी कपाळे याने पाच हजाराची लाच घेतली. सदर रक्कम घेताच त्यास रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...