आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहाटेच्या काळ्याकुट्ट अंधारात नक्षलविरोधी शोधमोहीम सुरू असताना उत्तर गडचिरोलीतील खोबरामेंढा घनदाट जंगलात ९० नक्षलींविरोधात आठ तास यशस्वी झुंज दिली. पाच नक्षली ठार झाले तर कमांडर जेरबंद. या शौर्याबद्दल तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक आणि औरंगाबादचे विद्यमान पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले आहे. सोबतच त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल गृह मंत्रालयाचे आंतरिक सुरक्षापदकसुद्धा जाहीर झाले. राष्ट्रपतींकडून दुसऱ्यांदा ‘शौर्यपदक’ ने सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्यांदा एसपी मनीष कलावनियांचा होणार सन्मान; सोबत लढलेल्या पोलिसांना पुरस्कार केला समर्पित राष्ट्रपती पुरस्कारासोबतच कलवानिया यांना गडचिरोलीतील अति उत्कृष्ट सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘आंतरिक सुरक्षा पदक’सुद्ध जाहीर करण्यात आले आहे. एकाच वेळी दोन पदके हे पोलिस दलातील दुर्मिळ यश मानले जात आहे. १८ ऑक्टोबर २०२० रोजी किसनेली गावाजवळील नक्षलींचे एन्काउंटर केल्याबाबत त्यांना १४ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रपतींच्या शौर्यपदकाने सन्मानित केले आहे. त्या मोहिमेत सुखरूप राहिलेल्या पोलिस सहकाऱ्यांना त्यांनी हा पुरस्कार अर्पण केला.
जयदत्त बबन भवर : दुर्गम क्षेत्रात २ वर्षे उत्कृष्ट कामगिरीचा गौरव ग्रामीण पोलिस दलाचे उपविभागीय अधिकारी जयदत्त बबन भवर यांनादेखील केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आंतरिक सुरक्षा पदक जाहीर झाले आहे. गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित व दुर्गम क्षेत्रात दोन वर्षे उत्कृष्ट व निष्कलंक सेवा केल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला.
गाेकुळ पुंजाजी वाघ : ३२ वर्षांच्या निरंतर व विशेष सेवेबद्दल सन्मान शहर पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत गाेकुळ पुंजाजी वाघ यांना त्यांच्या ३२ वर्षांच्या सेवेसाठी २०२३ चे राष्ट्रपदी पोलिस पदक जाहीर झाले आहे. १९९० मध्ये पोलिस दलात रुजू झालेल्या वाघ यांना आतापर्यंत ४२१ बक्षिसे व ८ प्रशंसापत्रे प्राप्त असून २०१७ मध्ये त्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.