आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करा; पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांचे आदेश

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील ठाणेदारांना दिले आहेत. याशिवाय गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक कलासागर यांनी जिल्ह्यातील ठाणेदारांना सूचना दिल्या आहेत. याशिवाय गणेश मंडळांना देखील आवाहन केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकडे ठाणेदार यांनी लक्ष द्यावे. तसेच गणेश मंडळांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. गणेश मंडळाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत. या परिसरात जुगार अड्डे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. त्यासाठी गणेश मंडळांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त राहीलच यासोबतच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त राहणार आहे. तसेच दिवसा पेट्रोलिंग साठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना कलासागर यांनी दिल्या. शासनाने गणेशोत्सवाच्या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच कोविडच्या नियमांचे ही पालन करण्याच्या सूचना कलासागर यांनी दिल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.

पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहतील याकडे संबंधित ठाणेदारांनी लक्ष देण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक कलासागर यांनी दिल्या आहेत. गणेश उत्सवात मूर्ती स्थापना तसेच विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...