आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील शेलगाव खुर्द येथे सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ औरंगाबाद व ग्रामपंचायत कार्यालय शेलगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने गावामध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले. शेलगाव खुर्द येथे सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आलेली आहेत. त्याच उद्देशाने शेलगाव खुर्द येथील प्रथम नागरिक सरपंच लंकाताई गजानन इधाटे यांनी संस्थेचे विश्वस्त प्रसन्ना पाटील व सुहास अजगावकर यांना ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर गावात जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात यावे अशी मागणी केली होती, जेणेकरून जलशुद्धीकरण यंत्र बसवल्याने पाण्यामुळे होणाऱ्या गावातील नागरिकांना आजाराला समोरे जावे लागणार नाही. या उद्देशाने सरपंचांनी संस्थेकडे मागणी केली होती. त्यानंतर संस्थेने अवघ्या काही दिवसांत शेलगाव खुर्द या ठिकाणी एका नामांकित कंपनीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण यंत्र बसविले. त्या जलशुद्धीकरण यंत्रामुळे गावकऱ्यांना शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे. या यंत्राची सुरुवात बुधवार (ता. ८) जूनपासून करण्यात आली. त्यामध्ये पाच रुपयामध्ये २० लिटर पाणी मिळणार आहे. सदरील पाणी शुद्धीकरणाची सुरुवात शेलगाव खुर्द या ठिकाणी शेलगावचे माजी सरपंच साहेबराव पाटील इधाटे यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी गजानन इधाटे, चंद्रकांत इधाटे, सोमीनाथ इधाटे, बाळू पुरी आदींची उपस्थिती होती. शेलगाव खुर्द येथे जलशुद्धीकरण यंत्राच्या सुरुवात प्रसंगी ग्रामस्थ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.