आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादची पाणी पुरवठा योजना:मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचा पाईप टाकण्याचा देखावा; पाच दिवसात 20 मीटरचे काम अपूर्ण

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेवरुन चांगलेच वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील 2 जून रोजी अधिकाऱ्यांची बैठक घेवून नवीन योजनेच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठेकेदार व अधिकाऱ्यांनी घाई करत लबबग सुरु केली. 6 जून रोजी पाईप टाकण्याच्या कामाला सुरुवात केली. असे जाहीर करण्यात आले.

नेमके हे काम कसे सुरु आहे. यासाठी दिव्य मराठीच्या टिमने पाहणी केली. तेव्हा चित्र उलटेच दिसले. पाच दिवसात 20 मीटरपेक्षा सुद्धा काम पूर्ण झाले नाही. एकी पाईप अजून टाकल्या गेलेला नाही. काम सुरु झाले त्या ठिकाणी फक्त एक पोकलँड मशीन, सहा कामगार उपस्थित होते. पोकलँडमध्ये डिझेल नसल्यामुळे ते कामही थांबले होते. दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. मात्र याच गतीने काम सुरु राहील्यास 20 वर्षात ही पूर्ण होणार नाही. याचे मुख्य कंत्राट जेव्हीपीआर या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने पाईप टाकण्याचे काम पुण्याच्या जे. जे कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे हा पाईप टाकण्याचा शुभारंभ फक्त मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी होता अशी चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. या कामा बाबत दोन्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दिवसरात्र काम केले तर दोन वर्ष

सध्या कारखान्या चाचणी घेण्याकरीता पाईपची निर्मिती सुरु आहे.जर या कारखान्या किमान १६ तास म्हणजे दोन शिफ्टमध्ये काम चालले तर रोज 50 मीटर पाईप तयार होईल. हे गृहीत धरुन साधारण 400 दिवसात 40 किलोमीटर पाईप लाईन तयार करण्यात येईत असा अंदाज काढण्यात आला. आहे. यात सुट्या, लोडशेंडीग व इतर बाबींचा विचार करण्यात आलेला नाही. जर एक शिफ्टमध्ये काम चालले तर 40 किलोमीटरसाठर 800 दिवस लागतील. मात्र 24 तास तीन शिफ्टमध्ये काम झाले तर एका वर्षात 40 किलोमीटर पाईप तयार होतील असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...