आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:कुणी रात्री स्वत:च रुळावर झाेपले तर त्याला राेखायचे तरी कसे : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेत 16 प्रवासी रेल्वेखाली चिरडून मृत्युमुखी : याचिकाकर्ता

स्थलांतरित मजुरांची पायपीट आणि अपघातांत त्यांचा मृत्यू होण्याच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. याचिकाकर्त्याने औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडजवळ रुळावर झाेपलेल्या १६ मजुरांना रेल्वेने चिरडल्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणाले, ‘ते रात्री आपणहून रुळांवर झोपत असतील तर त्यांना कुणी रोखणार तरी कसे? देशभरात स्थलांतरितांचे पलायन रोखणे वा त्यांची देखरेख करणे कोर्टाला शक्य नाही. या प्रकरणी सरकारच कार्यवाही करेल.’

याचिकाकर्त्याचे वकील अलख श्रीवास्तव कोर्टाला म्हणाले, मजूर सातत्याने रस्त्यांवरून पायपीट करत आहेत. औरंगाबाद रुळावर झोपलेल्या १६ मजुरांना रेल्वेने चिरडले. मध्य प्रदेश आणि यूपीत रस्ते अपघातांतही मजुरांचा मृत्यू झाला आहे. त्यावर राज्य सरकार मजुरांना सुविधा देत नाही का, असा प्रश्न कोर्टाने केला. उत्तरात सॉलीसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, राज्य सरकार परिवहनाची व्यवस्था करत आहे. मात्र सर्वांना एकाच वेळी पाठवता येत नाही. मजूर मात्र आपला नंबर येण्याची वाट न पाहता पायीच निघत आहेत. त्यांना कसे रोखायचे?

दरम्यान, एकही मजूर घरी परतण्यासाठी रस्ते किंवा रेल्वेरुळांवरून पायपीट करणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश केंद्राने राज्यांना दिले. मजुरांना घरी परतण्याची व्यवस्था करणे ही राज्यांची जबाबदारी असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...