आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड काळ:मेल्ट्रॉनमध्ये 15 दिवसांत सुरू होणार शस्त्रक्रिया ; 350 बेडची व्यवस्था

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडकाळात अनेकांसाठी आधार बनलेल्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये आता नियमितपणे ओपीडी सुरू आहे. पुढील १५ दिवसांत शस्त्रक्रिया आणि प्रसूतीची व्यवस्थादेखील सुरू होणार आहे, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडेलचा यांनी दिली. मेल्ट्रॉनमधील ऑपरेशन थिएटरचे काम पूर्ण झाले आहे. फक्त आता निर्जंतुकीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले की या ठिकाणी पुढील काम सुरू होईल. यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागेल. पहिल्या टप्प्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, हर्निया, अपेंडिक्स अशा छोट्या शस्त्रक्रिया होतील. याचदरम्यान या हॉस्पिटलसाठी स्वतंत्र स्त्रीरोग तज्ज्ञ आणि सर्जन नेमण्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर मोठ्या शस्त्रक्रिया होतील. येथे तीन मजले असून ३५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...