आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट ट्रेन:नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण सुरू; शेतात जाऊन पाहणी, समृद्धी महामार्गालगत जाणार बुलेट ट्रेन

औरंगाबाद / नामदेव खेडकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बहुचर्चित मुंबई- नाशिक- औरंगाबाद- नागपूर या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणाचे काम देण्यात आलेल्या ‘तुला’ या एजन्सीचे प्रतिनिधी ‌संभाव्य भूसंपादन हाेणाऱ्या शेतावर जाऊन तिथे सध्या नेमके काय आहे याची पाहणी करत आहेत. याआधी या मार्गासाठी विमानातून लिडार सर्वेक्षण झालेले आहे. समृद्धी महामार्गालगतच बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे.

केंद्र शासनाच्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचआरसीएल) देशात बुलेट ट्रेनसाठी सात प्रकल्पांची घोषणा केली आहे. या पहिल्या टप्प्यातील घोषित मार्गांमध्ये मुंबई ते नागपूर या मार्गाचाही समावेश आहे. या मार्गाच्या भूसंपादनासाठी आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी विमानातून ‘लिडार’ तंत्रज्ञानाच्या आधारे हवाई सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. त्या सर्वेक्षणात प्रत्यक्ष प्रस्तावित मार्गाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या चित्रीकरणातून शेतजमिनी, डोंगर, खाणी, जंगले, तलाव, विहिरी, शेतांमध्ये असलेली पिके, झाडे यांचा डाटा गोळा करण्यात आला होता.

औरंगाबाद, नाशिक, नगर, जालन्यात सर्वेक्षण
आता एनएचआरसीएलने प्रत्यक्ष शेतांवर जाऊन प्राथमिक पाहणीचे काम सुरू केले आहे. हे काम पुण्यातील ‘तुला’ या एजन्सीला देण्यात आलेले आहे. ‘तुला’मार्फत औरंगाबादमधील लोकराज्य ही स्वयंसेवी संस्था औरंगाबाद, नाशिक, नगर आणि जालना या चार जिल्ह्यांत सर्वेक्षणाचे काम करत आहे. या सर्वेक्षणात शेतात सध्या कोणते पीक आहे, बांधावरील झाडे, विहिरी, बोअरवेल यांची माहिती संकलित केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...