आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण विभागाचा स्वतःच्याच उपक्रमांना हरताळ:हंगामी स्थलांतरित मुलांच्या सर्वेक्षणाचा मुहूर्त हुकला, सर्वे चालू- अधिकाऱ्यांचा दावा

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे हंगामी स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर कालावधीत शिक्षण विभागामार्फत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, 20 नोव्हेंबर रोजी रविवारी असल्याचे कारण सांगत हे सर्वेक्षण पुन्हा पुढे ढकलले.

सोमवारपासून हे सर्वेक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. असे सांगण्यात आले होते. मात्र शिक्षण विभागातीलच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही विद्यार्थ्यांचे सर्वैक्षण सुरु झालेले नाही. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता नाही सर्वेक्षण सुरु आहे असे सांगण्यात येत आहे.

ऊसतोड मजूर, दगडखान मजूर, वीट भट्टी कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार आदींचे व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. या स्थलांतरात कुटुंबीयांबरोबर मुले देखील स्थलांतरित होत असतात. या स्थलांतरित मुलांचे शैक्षणिक नुकसान नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात तीन ते अठरा वयोगटातील मुलांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणात जिल्ह्याबाहेर स्थलांतरित होणारे विद्यार्थी तसेच इतर जिल्ह्यांतून औरंगाबाद जिल्ह्यात येणारे स्थलांतरित विद्यार्थी यांची नोंद घेतली जाणार आहे. स्थलांतरित विद्यार्थी राज्यातील कोणत्याही भागात गेले तरी त्यांना तेथील शाळेत प्रवेश मिळावा व शिक्षण पुढे सुरू राहावे, यासाठी अशा विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली असून, त्याद्वारे स्थलांतरित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात राहता येणार आहे.

यासाठी व्यापक स्वरूपात सर्वेक्षण मोहीम राबवून प्रभावी अमंलबजावणी आवश्यक आहे. तरी 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येणार होती. मात्र, आता ही मोहिम पुढे ढकलली असुन ती सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता होती. मात्र सोमवार आणि मंगळवार दोन्ही दिवस गेले. तरी सर्वेक्षण सुरु झालेले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात सर्वेक्षण सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले असता दोन दिवसात किती मुले आढळून आली? असे विचारले असता उत्तर मिळाले नाही.

दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सर्वेक्षण सुरु आहे. विद्यार्थ्यांना स्थलांतर होण्यापासून थांबविण्यात येत आहे. तसेच काही गावांमध्ये मुलांना थांबविण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र ऑक्टोंबर महिन्यातच ऊसतोड कामगारांचे स्थलांतर झाले आहे. महिन्यानंतर होणारे सर्वेक्षणही वेळेत होत नसल्याने सर्वेक्षणाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...