आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मराठवाड्यातील बारवांचे सर्वेक्षण करा; दुरुस्तीसाठी सीएसआरमधून निधी देणार, विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात अनेक पुरातन बारवा आहेत. मात्र या बारवांची अवस्था अतिशय वाईट आहे. बारव संवर्धन समितीच्या वतीने या बारवांची स्वच्छता करण्यात येत आहे. या बारवांचा समावेश अमृत सरोवर योजनेत करण्यात यावा, अशी मागणी बारव संवर्धन समितीच्या वतीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याबाबत केंद्रेकर यांनी देखील मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत बारवांचे जिल्ह्यातील सर्वेक्षण करण्याच्या आणि आवश्यकतेनुसार सीएसआरमधून निधी देण्याच्या सूचना दिल्या.

बारव संवर्धन समितीच्या वतीने श्रीकांत उमरीकर, मल्हारीकांत देशमुख, आर्किटेक्चर प्रदीप देशपांडे यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर गुरुवारी आयुक्तांनी याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विभागीय आयुक्त शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील बारवांची पाहणी देखील करणार आहेत. केंद्रेकर यांनी सांगितले की, पुरातन बारवांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किती बारव आहेत त्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.त्यानंतर दुरुस्तीसाठी लागणारा निधी शासन पातळीवर अथवा सीएसआरमधून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

अमृत सरोवरमधून दुरुस्ती करा
श्रीकांत उमरीकर यांनी सांगितले की, मराठवाड्यातील बारवांची स्वच्छता, गाळ काढणे हे काम आमच्या वतीने सुरू आहे. त्यामुळे त्याचे इतर संवर्धन करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र शासनाच्या अमृत सरोवर योजनेत याचा समावेश केल्यास बारवांच्या दुरुस्तीसाठी मदत होईल. तसेच बारवांचे संवर्धन करता येईल, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...